ICAI CA July Exams Opt-Out नवी दिल्ली:चार्टड अकाऊंटंटच्या परीक्षा घेणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंसनं जुलै 2021 च्या फायनल, इंटरमिजिएट आणि आयपीसी आणि आयक्यूसी परीक्षेसंदर्भात एक नोटीस जारी केलं आहे. जुलै 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या काळात एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाला किंवा त्याचे कुटुंबिय कोरोनाबाधित झाले तर त्याला ऑप्ट आऊट सुविधेचा लाभ घेता येईल. ही सुविधा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. मात्र, विद्यार्थ्यांना कोरोना चाचणीचा आरटपीसीआर रिपोर्ट सादर करावा लागेल. (ICAI gave opportunity to for CA July Exams opt out option to Covid 19 infected candidates )
Important Announcement regarding ICAI Chartered Accountancy Examinations(Final, Intermediate/ IPC, Foundation and PQC Courses) – May/ July 2021 – Details regarding Opt – Out Option being provided to Candidates. pic.twitter.com/7FmJOKEyKd
— Institute of Chartered Accountants of India – ICAI (@theicai) June 21, 2021
आयसीएआयनं जारी केलेल्या नोटीसनुसार विद्यार्थ्यांनी सादर केलेले कोरोना चाचणीचे अहवाल तपासण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांचे रिपोर्ट खोटे किंवा बनावट असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मे/ जुलै परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना देता येणार नाही ते विद्यार्थी नोव्हेंबरमध्ये परीक्षा देऊ शकतात. फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षांच्या जुन्या अभ्यासक्रामची परीक्षा देण्याची शेवटी संधी नोव्हेंबर 2021 मध्ये उपलब्ध असेल.
सीए फायनलची परीक्षा 5 जुलै ते 19 जुलै दरम्यान होईल. CA फायनल (जुना अभ्यासक्रम) ग्रुप 1 ची परीक्षा 5, 7, 9 आणि 11 जुलैला आयोजित केली जाईल. सीए फायनल (जुना अभ्यासक्रम) ग्रुप 2ची परीक्षा 13, 15, 17 आणि 19 जुलै या काळात आयोजित केली जाईल. आईसीएआयनं 5 ते 20 जुलैदरम्यान इंटरमिजिएट (आईपीसी) आणि इंटरमिजिएट (नवा अभ्यासक्रम) ची परीक्षा आयोजित केली जाईल. विमा आणि जोखीम व्यवस्थापन (IRM) तंत्रत्रान परीक्षा आणि आंतरराष्ट्रीय कर (INTT-AT) ही परीक्षा 5, 7, 9 आणि 11 जुलै रोजी आयोजित केली जाईल.
आयसीएआय ही एक वैधानिक संस्था आहे. ही संस्था देशातील चार्टर्ड अकाउंटन्सीच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी 1949 मधील सनदी लेखाकार कायद्याखाली स्थापन करण्यात आली होती. सध्या या संस्थेचे 3 लाखांहून अधिक सदस्य आहेत. सीए शिक्षणामध्ये उच्चतम दर्जा राखण्याची जबाबदारी आयसीएआयवर आहे. ज्या विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय करायचा असेल, त्याने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा दिल्यानंतर आयसीएआयच्या फाऊंडेशन कोर्ससाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या:
ICAI कडून CA परीक्षेसाठी नवी घोषणा, विद्यार्थ्यांना नव्यानं करावं लागणार ‘हे’ काम
युजीसीचा मोठा निर्णय, सीएच्या डिग्रीला आता पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता
ICAI gave opportunity to for CA July Exams opt out option to Covid 19 infected candidates