ICSI CSEET Result 2021Declared : आयसीएसआय सीएसईईटीचा निकाल जारी, icsi. edu या वेबसाईट पाहा तुमचा निकाल

| Updated on: Jul 21, 2021 | 3:55 PM

कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टचा निकाल आज लागणार आहे. ICSI च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन हा निकाल पाहता येणार आहे.

ICSI CSEET Result 2021Declared : आयसीएसआय सीएसईईटीचा निकाल जारी, icsi. edu या वेबसाईट पाहा तुमचा निकाल
ICSI RESULT
Follow us on

मुंबई : कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टचा निकाल आज लागला आहे. ICSI च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन हा निकाल पाहता येणार आहे. ICSI CSEET परीक्षा 10 आणि12 जुलै रोजी अशा दोन्ही दिवस घेण्यात आलेल्या परीक्षेचा आज निकाल जाहीर  झाला आहे. (ICSI CSEET result 2021 declared today check result on icsi edu)

CSEET Results 2021 : निकाल कसा पाहावा ?

ICSI च्या ऑफिशियल वेबसाईटवर लॉगिन करा. त्यासाठी www.icsi.edu या वेबसाईटवर जा

त्यानंतर या ऑफिशियल वेबसाईटच्या होमपेजवर CSEET Results 2021 हा ऑप्शन दिसेल.

लॉगिन करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व डिटेल्स भरा

त्यानंतर सर्व डिटेल्स सबमिट करा. तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

तुमच्या निकालाची प्रत डाऊनलोड करुन घ्या. भविष्यात निकालाच्या हार्ड कॉपीची तुम्हाला गरज भासेल

ICSI CSEET काय आहे ?

कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टचे आयोजन याच महिन्यात म्हणजेच 10 आणि 12 जुलै 2021 मध्ये करण्यात आले होते. कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टला CSEET असंसुद्धा म्हटलं जातं. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे या परीक्षेचे आयोजन केले जाते. CSEET ही परीक्षा वर्षातून चार वेळे घेतली जाते. विशेषत: जानेवारी, मे, जुलै, आणि नोव्हेंबर महिन्यात या परीक्षेचे आयोजन केले जाते. इयत्ता 12 वी तसेच समकक्ष परीक्षा उत्तीण असलेल्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देता येते. या परीक्षेमध्ये बिझनेस कम्युनिकेशन, कायदेशीर योग्यता आणि तार्किक योग्यता, आर्थिक आणि व्यवसाय पर्यावरण, चालू घडामोडी आणि प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशन स्किल आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

इतर बातम्या :

SBI Clerk 2021 Exam: एसबीआय ज्युनिअर असोसिएट परीक्षा स्थगित, लवरकच पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता

Job News: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 427 पदांवर अप्रेंटिस भरती, दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

Post Office मधील बर्‍याच रिक्त जागांवर भरती, 10 वी किंवा 12 वी पासना संधी, पटापट तपासा

(ICSI CSEET result 2021 declared today check result on icsi edu)