मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी आहे. थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभागाकडून राबवली जातंय. पोस्टामध्ये काम करण्याची ही संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांना indiapost.gov.in या साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देखील मिळेल.
उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून चालणार नाहीये. अर्जाची हार्ड कॉपी देखील सबमिट करावी लागणार आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत ही हार्ड कॉपी सबमिट करावी लागेल. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग फटाफट या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारे सुवर्णसंधीच आहे.
या भरती प्रक्रियेव्दारे भारतीय डाक विभागामध्ये 78 जागा भरल्या जाणार आहेत. 78 ड्राइवर (साधारण ग्रेड) या पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा ही घेतली जाईल.
मान्यता प्राप्त बोर्डातून उमेदवार हा दहावी पास असायला हवा. उमेदवारांना हार्ड कॉपी कागदपत्रांसह व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, उत्तर प्रदेश या पत्त्यावर फक्त पोस्टाने पाठवावे लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा.