IDBI Executive Admit Card 2021: आयडीबीआय बँकेकडून एक्झिक्युटिव्ह पदाच्या परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी, डाऊनलोड कसं करायचं?

| Updated on: Aug 29, 2021 | 2:31 PM

ऑनलाईन परीक्षा 5 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येईल. ज्या उमेदवारांनी अद्याप प्रवेशपत्र डाउनलोड केलेले नाही ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

IDBI Executive Admit Card 2021: आयडीबीआय बँकेकडून एक्झिक्युटिव्ह पदाच्या परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी, डाऊनलोड कसं करायचं?
आयडीबीआय बँक
Follow us on

नवी दिल्ली: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने एक्झिक्युटिव्ह पदाच्या भरतीसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला आहे ते अधिकृत वेबसाईट idbibank.in ला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. या परीक्षेद्वारे IDBI बँकेत एकूण 920 कार्यकारी पदे भरली जाणार आहेत.

5 सप्टेंबर रोजी परीक्षा

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 4 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाली होती. आता या भरतीसाठी अॅडमिट कार्ड वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहेत. ऑनलाईन परीक्षा 5 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येईल. ज्या उमेदवारांनी अद्याप प्रवेशपत्र डाउनलोड केलेले नाही ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

स्टेप1 : सर्वप्रथम IDBI च्या अधिकृत वेबसाइट idbibank.in ला भेट द्या .
स्टेप2 : वेबसाईटच्या होमपेजवरील कार्यकारी भरती लिंकवर क्लिक करा.
स्टेप3: आता ऑनलाईन परीक्षेसाठी कॉल लेटरच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप4 : युझरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
स्टेप5 : लॉगिन केल्यानंतर प्रवेशपत्र उपलब्ध होईल.

रिक्त पदाचा तपशील

आयडीबीआय बँक कार्यकारी पदांवर कंत्राटी पद्धतीने पात्र उमेदवारांची देशभरातील विविध शाखांमध्ये नेमणूक करणार आहे. कार्यकारी पदासाठी 920 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 373 जागा, ईडब्ल्यूएससाठी 92 जागा, ओबीसी उमेदवारांसाठी 248 जागा, अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 138 आणि एसटी उमेदवारांसाठी 69 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

एक वर्षाच्या करारावर नेमणूक

पात्र उमेदवार आयडीबीआय बँकेचा अधिकृत वेबसाईट idbibank.in वर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. बँक कार्यकारी पदावरील उमेदवारांची नियुक्ती फक्त एका वर्षासाठी करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कामगिरीवर त्यांचा कार्यकाळ पुढील दोन वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.

पगार किती?

आयडीबीआयच्या कार्यकारी पदासाठी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर 5 सप्टेंबरला परीक्षा आयोजित केली जाणार आहे. तर, निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी 29 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 31 हजार तर तिसऱ्या वर्षी 34 हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे.

इतर बातम्या:

SSC GD Constable 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल 25 हजार जागांवर भरती, 31 ऑगस्टपर्यंत नोंदणींची संधी, वाचा सविस्तर

SBI Recruitment 2021 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी, आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

IDBI Executive Admit Card 2021 Released know how to Download know details