जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात आणि एक चांगली नोकरी हवी असेल तर एक अत्यंत मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही खरोखरच एक अत्यंत मोठी संधी म्हणावी लागेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) कडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.
ही भरती प्रक्रिया 11 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत. 16 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यापूर्वीच इच्छुकांना अर्ज ही करावी लागणार आहेत.
इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट iibf.org.in वर जाऊन लॉग इन करावे लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 700 रूपये फीस ही उमेदवारांना भरावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ही द्यावी लागेल. 17 नोव्हेंबर 2024 रोजी ही परीक्षा होईल. चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली या चार शहरांमध्ये परीक्षा पार पडेल. केवळ निवडलेल्या उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. उमेदवारांना वार्षिक 8 लाख रूपयांपर्यंत पगार मिळणार असल्याचे सांगितले जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.