भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ही पदे जाणार भरली, इतक्या पदांसाठी..

| Updated on: May 01, 2024 | 12:18 PM

IIIT recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ही पदे जाणार भरली, इतक्या पदांसाठी..
Indian Institute of Information Technology Nagpur
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया एकून 11 जागांसाठी सुरू आहे. यामध्ये संगणक विज्ञान अर्थात कम्प्युटर सायन्स आणि अभियांत्रिकीसाठी 9 तर इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीसाठी 2 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

संगणक विज्ञान पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पीएच.डी. / एम.टेक. संगणक विज्ञान / बी.टेक. आणि एम.टेकमध्ये शिक्षण झालेले असावे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पीएच.डी. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी यांमध्ये बी.टेकमध्ये शिक्षण झालेले असावे.

या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला https://www.iiitn.ac.in/ या साईटवर मिळेल. याच साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवाराने भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.

उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. https://iiitn.ac.in/Downloads/recruitments/2024/april/AAP-%202024-25%20-%20Recruitment.pdf येथे आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना वाचायला मिळेल. अधिसूचना वाचून उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. फटाफट करा अर्ज आणि मिळवा भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे नोकरी.