भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती सुरू, सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी

| Updated on: Dec 27, 2023 | 12:31 PM

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे थेट भारतीय डाक विभागाकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती सुरू, सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Follow us on

मुंबई : भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, बऱ्याच वेळा भरती प्रक्रिया सुरू होते आणि त्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना देखील नसते. आता पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न अनेकांचे पूर्ण होऊ शकते. थेट भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत येणार्‍या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये.

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
विशेष म्हणजे थेट इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये अधिकारी होण्याची ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेतून महाव्यवस्थापक वित्त अधिकारी ही जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे चार्टर्ड अकाऊंट क्षेत्रात म्हणजे सीए झालेले असावे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 35 आणि जास्तीत जास्त 55 असणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे तगडी पगार देखील या पदासाठी दिली जाणार आहे. 3 लाख 27 हजार पगार उमेदवारांना मिळणार आहे. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 जानेवारी 2024 आहे. यामुळे फटाफट इच्छुकांनी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती आपल्याला साईटवर मिळेल.