भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरती, लाखाच्या घरात पगार आणि…

| Updated on: Sep 23, 2024 | 1:52 PM

Indian Coast Guard Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे.

भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरती, लाखाच्या घरात पगार आणि...
Indian Coast Guard
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. भारतीय तटरक्षक दलात नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरतीसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

भारतीय तटरक्षक दलाकडून ही भरती प्रक्रिया वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी (लॉजिस्टिक्स),  सहायक संचालक (राजभाषा), विभाग अधिकारी, नागरी राजपत्रित अधिकारी, फोरमॅन अशा विविध पदांसाठी होत आहे. भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरतीतून 38 पदे ही भरली जाणार आहेत. 

indiancoastguard.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर 60 दिवसांच्या आतमध्येच उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करावी लागतील. यामुळेच इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालता अर्ज करावीत. 

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून  56 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. अधिसूचनेवर त्यासंबंधित माहिती तुम्हाला सविस्तरपणे वाचण्यास मिळेल.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना पगार हा अत्यंत चांगला मिळणार आहे. उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावीत. भारतीय रेल्वेमध्ये देखील काही पदांसाठी सध्या बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे.