नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 350 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण 350 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2 जुलैपासून सुरु होणार आहे. (Indian Cost Guard recruitment 2021 for 350 post check here for details)
कोणत्या पदांसाठी भरती?
भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार नाविक (जनरल ड्युटी) नाविक (डोमेस्टिक ब्रँच), यांत्रिक (मेकॅनिकल), यांत्रिक (इलेक्ट्रिकल) आणि यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) या पदांसाठी भरती होणार आहे.
नाविक (जनरल ड्युटी):260
नाविक (डोमेस्टिक ब्रँच): 50
यांत्रिक (मेकॅनिकल): 20
यांत्रिक (इलेक्ट्रिकल): 13
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स): 07
पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या https://joinindiancoastguard.cdac.in/ या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 2 जुलै ते 16 जुलैच्या दरम्यान आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करु शकतात.
नाविक (जनरल ड्युटी): उमदेवार बारावी विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह उत्तीर्ण झालेले असावेत.
नाविक (डोमेस्टिक ब्रँच): मान्यताप्राप्त बोर्डातून उमेदवार दहावी उत्तीर्ण झालेला असावा.
यांत्रिक : मान्यताप्राप्त बोर्डातून उमेदवार दहावी उत्तीर्ण झालेला असावा. इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, रेडिओ पॉवरमधील एआयसीटीईद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून पदविका उत्तीर्ण असावा.
भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदासाठी तीन टप्प्यात निवड प्रक्रिया राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा घेतली जाईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमदेवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर त्यांना शारीरिक चाचणी देखील घेतली जाईल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. पहिले दोन टप्पे यशस्वी पार केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करुन वैद्यकीय चाचणीसाठी बोलावलं जाईल.यशस्वी उमदेवारांना प्रशिक्षणासाठी बोलावलं जाईल, फेब्रुवारी 2022 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमदेवारांना कोणतंही परीक्षा शुल्क भरावं लागणार नाही. इतर उमेदवारांना 250 रुपये परीक्षा फी भरावी लागेल. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटला भेट द्यावी.
राडा, रक्तपात हा आपला गुणधर्म नाही, मुंबई दंगलीवेळी शिवसैनिक जगाने पाहिला : उद्धव ठाकरेhttps://t.co/fJQ491meO6#ShivSena #UddhavThackeray @OfficeofUT @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 19, 2021
संबंधित बातम्या:
Skill India Mission : या योजनेतंर्गत तरुणांना सरकारकडून ट्रेनिंग आणि रोजगार, पाहा कसा लाभ घ्यायचा?
Indian Cost Guard recruitment 2021 for 350 post check here for details