ICG Recruitment 2021: नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये असिस्टंट कमांडंट साठी 50 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण 50 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 4 जुलैपासून सुरु होणार आहे. (Indian Cost Guard recruitment 2021 for 50 post of Assistant Commandant check here for details)
भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार असिस्टंट कमाडंट या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या https://joinindiancoastguard.cdac.in/ या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 4 जुलै ते 14 जुलैच्या दरम्यान आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करु शकतात. इंडियन कोस्टगार्डच्या माहितीनुसार एकूण असिस्टंट कमाडंटच्या 50 पदांवर भरती होणार आहे. यामध्ये जनरल ड्युटीसाठी 40 जागा भरल्या जातील यामध्ये 11 जागा खुल्या, ईडबल्यूएससाठी 3, ओबीसीसाठी 7 , एससीसाठी 6 आणि एसटीसाठी 13 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर, टेक्निकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी 10 जागांवर भरती होणार आहे.
इंडियन कोस्टगार्डमध्ये जनरल ड्युटी पदावर अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत. मात्र, बारावीला विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावेत. टेक्निकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिल्पोमा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्री अँड प्रोडक्शन, आटोमोटिव, किंवा मरिन आकर्किटेक्चर यामधील पदवी उत्तीर्ण झालेले असावेत. अर्ज करण्यपूर्वी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन पाहणं आवश्यक आहे.
कोरोना काळात बँक झाल्या मालामाल; एसबीआयपासून सगळ्याच बँकांची बक्कळ कमाईhttps://t.co/T1pAh9fYVc#bank |#government |#private |#profit |#corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 26, 2021
भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार नाविक (जनरल ड्युटी) नाविक (डोमेस्टिक ब्रँच), यांत्रिक (मेकॅनिकल), यांत्रिक (इलेक्ट्रिकल) आणि यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) या पदांसाठी देखील भरती होणार आहे.
नाविक (जनरल ड्युटी):260
नाविक (डोमेस्टिक ब्रँच): 50
यांत्रिक (मेकॅनिकल): 20
यांत्रिक (इलेक्ट्रिकल): 13
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स): 07
संबंधित बातम्या:
Job News: भारतीय तटरक्षक दलामध्ये 350 जागांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
संजय राऊत मातोश्रीवर, मुख्यमंत्र्यांना भेटताय का? राऊत म्हणाले शिवसेना पक्षप्रमुखांना भेटतोय!
(Indian Cost Guard recruitment 2021 for 50 post of Assistant Commandant check here for details)