Indian Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दलामध्ये 80 जागांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

| Updated on: Jan 25, 2022 | 6:15 AM

भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 80 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

Indian Coast Guard  Recruitment : भारतीय तटरक्षक दलामध्ये 80 जागांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
job alert
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 80 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत (Recruitment) नोटिफिकेशन जारी केलं आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये (ICG) एकूण 80 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 22 जानेवारीपासून सुरु झाली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार इंजिन ड्रायव्हर, सारंग लास्कर, स्टोरअर कीपर, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फायरमन, फिटर, स्प्रे पेंटर, मेकॅनिकल, एमटीएस आणि लेबर, शीट मेटल वर्कर आणि इलेक्ट्रिकल फिटर या पदांसाठी भरती होणार आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही.

पदसंख्या

इंजिन ड्रायव्हर (08), सारंग लास्कर (03), स्टोरअर कीपर (04), सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (24), फायरमन (06), फिटर (06), स्प्रे पेंटर (01), मेकॅनिकल (6), एमटीएस (19) आणि लेबर (1) शीट मेटल वर्कर (01) आणि इलेक्ट्रिकल फिटर (01)

अर्ज कसा करायचा?

पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या https://joinindiancoastguard.cdac.in/ या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 22 जानेवारी ते 20 फेब्रुवारी इतकी आहे. उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करु शकतात. द कमिशनर कोस्ट गार्ड पूर्व विभाग नेपियर ब्रीज फोर्ट सेंट जॉर्ज, चेन्नई 600009 या ठिकाणी अर्ज पाठवावे लागतील.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे दहावी आणि बारावी यासह संबंधित विषयातील आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. तर उमेदवाराचं वय 18 ते 30 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

परीक्षा फी

भारतीय तटरक्षक दलाच्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. निवड झालेल्या उमदेवारांची नियुक्ती भारतात कुठेही केली जाईल.

इतर बातम्या:

BECIL Recruitment 2022 : बीईसीआयएलमध्ये 500 जागांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑईलमध्ये अप्रेटिंसची सुवर्णसंधी, 570 जागांसाठी अर्ज करण्याचं आवाहन

लिंक्डइन सर्वे: यंदा नोकरी बदलाची लाट, 82% कर्मचाऱ्यांचा जॉब चेंजचा मूड!

Indian Cost Guard recruitment 2022 for 80 post check here for details