इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती, थेट करा अर्ज आणि व्हा अधिकारी, लगेचच…

| Updated on: Sep 20, 2024 | 1:07 PM

indian oil recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती, थेट करा अर्ज आणि व्हा अधिकारी, लगेचच...
Indian Oil Corporation Limited
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल. अधिकारी होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून लॉ अधिकारी पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. iocl.com या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकता. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 ऑक्टोबर 2024 असेल. 

ही भरती प्रक्रिया 12 लॉ ऑफिसर म्हणजेच कायदा अधिकारी पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून एलएलबीमध्ये पाच वर्षांची पदवी घेतलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी फक्त शिक्षणाचीच नाही तर वयाची अटही लागू करण्यात आलीये. 

30 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना नियमाप्रमाणे शिक्षणाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. PG CLAT 2024 परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि ग्रुप टास्क देखील दिले जातील. 

शेवटी उमेदवाराला मुलाखत देखील द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही अर्ज करू शकता.