भारतीय रेल्वेकडून विविध पदांसाठी भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी थेट संधी…

| Updated on: Jul 22, 2024 | 3:27 PM

Indian Railway Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरतीसाठी लगेचच अर्ज करावा. रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे.

भारतीय रेल्वेकडून विविध पदांसाठी भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी थेट संधी...
Railway
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही मोठी सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागतील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 22 जुलै 2024 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलकडून मुंबई क्रीडा कोट्याअंतर्गत ही भरती सुरू आहे. चला तर मग उशीर न करता अर्ज करा. ही भरती प्रक्रिया 62 पदांसाठी सुरू आहे. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस, ऍथलीट्स अशा विविध क्षेत्रातील खेळाडू या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त उमेदवार, बारावी पास , ITI पास किंवा दहावी पासही उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाचीही अट लागू करण्यात आलीये. 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. rrccr.com.या साईटवर जाऊन अर्ज करा. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक उमदेवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 500 रूपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना भरतीसाठी 250 रूपये फीस ही लागणार आहे. उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यात होणार आहे. सर्वात अगोदर उमेदवाराला चाचणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर खेळाचे कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रशिक्षकाचे निरीक्षण यांचा समावेश असेल.