रेल्वे विभागात 3000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज आणि…

| Updated on: Sep 30, 2024 | 2:59 PM

Indian Railway Apprentice Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.

रेल्वे विभागात 3000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज आणि...
Railway
Follow us on

दहावी पास असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया थेट रेल्वे विभागाकडून राबवली जातंय. 3115 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

रेल्वे विभागाकडून 3115 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भारतीय रेल्वेच्या RRC Eastern Railway (ER) ने अप्रेंटिसशिपसाठी ही भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 24 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालीये. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 ऑक्टोबर 2024 आहे.

शेवटच्या तारखेच्या अगोदरच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास आणि संबंधित  ट्रेडमध्ये आयटीआय पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. rrcrecruit.co.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा या भरती प्रक्रियेसाठी द्यावी लागणार नाहीये. दहावी आणि आयटीआयच्या मार्काच्या आधारे गुणवत्ता यादी ही जाहीर केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागेल.