Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भरती ! शैक्षणिक पात्रता, शेवटची तारीख, एका क्लिकवर

| Updated on: Apr 08, 2022 | 6:49 PM

शेवटच्या तारखेनंतर पाठवल्या जाणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्यासंदर्भातील महत्त्वाच्या सुचना अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या आहेत. अपूर्ण आणि चुकीचे कागदपत्र सादर केल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.

Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भरती ! शैक्षणिक पात्रता, शेवटची तारीख, एका क्लिकवर
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भरती !
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत “न्यायिक अधिकारी”पदाच्या एकूण 25 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्जाची (Application)शेवटची तारीख (Last Date) 29 एप्रिल 2022 आहे. उमेदवार अर्ज करताना तो ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने करू शकतात किंवा ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. न्यायिक अधिकारी पदासाठी जागा उपलब्ध असून संपूर्ण महाराष्ट्रात २५ जागा उपलब्ध आहेत. शेवटच्या तारखेनंतर पाठवल्या जाणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्यासंदर्भातील महत्त्वाच्या सुचना अधिकृत वेबसाईट bombayhighcourt.nic.in वर दिलेल्या आहेत. अपूर्ण आणि चुकीचे कागदपत्र सादर केल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.

पदाचे नाव – न्यायिक अधिकारी

पद संख्या – 25 जागा

शैक्षणिक पात्रता – जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज पद्धत – ऑनलाईन ईमेल / ऑफलाईन

ईमेल आयडी – rgrp-bhc@bhc.gov.in

अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032

महत्त्वाचे

  • उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल) किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
  • अर्ज करण्यासंदर्भातील महत्त्वाच्या सुचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत
  • अपूर्ण कागदपत्रं आणि माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केलं जाईल
  • अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात बघावी

इतर बातम्या –

शेअर बाजारातील घसरणीला अखेर आज ब्रेक; सेंसेक्समध्ये 412 अंकाची वाढ, गुंतवणूकदारांना दिलासा

ST Andolan Mumbai: ज्या भाषणामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले, तो अ‍ॅड. सदावर्तेंचा बाईट ऐका

Sharad Pawar: पवारांच्या घराबाहेर तासभर राडा; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण…