500 हून अधिक पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज, ‘ही’ आहे मोठी संधी…

| Updated on: Sep 03, 2024 | 3:38 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधी नक्कीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची पद्धत.

500 हून अधिक पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज, ही आहे मोठी संधी...
job
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

इंडियन ओव्हरसीज बँकेकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 10 सप्टेंबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ही भरती प्रक्रिया 550 अप्रेंटिस पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार हे या भरतीसाठी आरामात अर्ज करू शकतात. 

या भरती प्रक्रियेसाठी 20 ते 28 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा, स्थानिक भाषा चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 944 रूपये फीस ही द्यावी लागेल. प्रवर्गातील उमेवारांना 472  रूपये फीस ही भरावी लागेल.

iob.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल आणि याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही एकदा व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. ही मोठी संधी नक्कीच आहे.