तुम्ही नोकरीच्या शोधात आहात आणि सरकारी नोकरी तुम्हाला हवी असेल तर एक अत्यंत मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
IRCTC ने AGM/DGM आणि डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक उमेदवारांना irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज ही करावी लागणर आहेत. याच साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
IRCTC कडून राबवल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 नोव्हेंबर 2024 आहे आणि त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. शेवटच्या तारखेच्या अगोदर उमेदवारांना अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये.
55 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. IRCTC च्या या भरती मोहिमेत निवडलेल्या उमेदवारांना आकर्षक पगार देखील दिला जाणार आहे. विशेष म्हणजे मुलाखतीमधून उमेदवाराची निवड ही केली जाईल. अंतिम निवड मुलाखतीतील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित असेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वात अगोदर IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज ही डाऊनलोड करावी लागणार आहेत आणि सर्व कागदपत्रांसह रेल्वे बोर्डाकडे पाठवावी लागतील. यासोबतच अर्जाची स्कॅन प्रत deputation@irctc.com वर ईमेल करणे आवश्यक आहे.