नोकरीच्या शोधात आहात? अत्यंत मोठी संधी, बंपर भरतीला होणार सुरूवात

| Updated on: Aug 11, 2024 | 3:12 PM

ITBP Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधी नक्कीच आहे.

नोकरीच्या शोधात आहात? अत्यंत मोठी संधी, बंपर भरतीला होणार सुरूवात
Indo Tibet Border
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता अर्ज करावा. ही एकप्रकारची मोठी संधीच आहे. उद्या म्हणजेच 12 ऑगस्ट 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांनी पशुवैद्यकीय कर्मचारी पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी उमेदवारांकडे बराच वेळ देखील आहे. 

ITBP कडून पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या 128 पदांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करेल. याअंतर्गत हेड कॉन्स्टेबल (डेझर व्हेटर्नरी), कॉन्स्टेबल (ॲनिमल अटेंडंट) आणि कॉन्स्टेबल (केनलमन) ही पदे भरण्यात येणार आहेत. हेड कॉन्स्टेबलची 9पदे आहेत. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरती आहे. 

मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण झालेले आणि पशुवैद्यकीय प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. सरकारी नियमानुसार वयाच्या अटीमध्ये थोडी सूटही देण्यात आलीये. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 100 रूपये फीस ही द्यावी लागणार आहे. recruitment.itbpolice.nic.in. या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. याच साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज देखील करावा लागणार आहे.