नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने आरामात अर्ज ही करू शकतो. जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट-ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER), पुडुचेरी यांच्याकडून ह भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया.
जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट-ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून प्राध्यापकांची 80 रिक्त पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलीये. प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ही भरती सुरू आहे.
प्राध्यापकांच्या 26 पदांवर आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 35 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. त्यामध्ये JIPMER प्राध्यापकांच्या 2 आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या 17 पदांवर भरती केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी लवकरच सुरू होणार आहे. 25 ऑक्टोबर 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 नोव्हेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. प्राध्यापक पदांसाठी कमाल वय 58 वर्षे तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 50 वर्षे वयोगटाची अट ही लागू करण्यात आलीये. शिक्षणाची अट नेमकी काय हे आपण अधिसूचनेवर बघू शकता.
jipmer.edu.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.