JEE Main Result: जेईई मेन 2021 सेशन्स 4 चा निकाल मंगळवारी रात्री उशिरा घोषीत करण्यात आलाय. यात रेकॉर्डब्रेक अशा 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवलेत. तर नंबर 1 रँकवर 18 जण आहेत. विशेष म्हणजे यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवलीय त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे.
जेईई मेन 2021 सेशन 4 च्या परीक्षा 2 सप्टेंबरला संपल्या होत्या. फायनल अन्सर की वर आक्षेप घेण्यासाठी 8 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती. त्यानंतर फायनल अन्सर की जारी करण्यात आली. तेव्हापासूनच जेईई मेन्सचा निकाल jeemain.nta.ac.in वर अपेक्षीत होता. गेल्या वर्षी 24 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले होते.
JEE Main Result 2021 चेक कसा कराल?
स्टेप 1- सर्वात आधी तुम्ही अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic वर जा
स्टेप 2- जेईई मेन 2021 च्या सेशन 4 च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
स्टेप 3- आता परीक्षेचं सेशन, अर्ज संख्या, जन्म तारीख नोंद करा
स्टेप 4- JEE मेन 2021 च्या निकालाची कॉपी डाऊनलोड करा.
कोणत्या साईटवर निकाल चेक करु शकता?
nta.ac.in
ntaresults.nic.in
jeemain.nta.nic.in
National Testing Agency (NTA) releases JEE Main results; 44 candidates get 100 percentile, 18 candidates on rank 1 pic.twitter.com/GO8vEfaZCd
— ANI (@ANI) September 14, 2021
कशी होती परिक्षा?
विशेष म्हणजे बीई/बिटेकसाठी JEE मेन पेपर 1 मध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आहेत तर पेपर 2 मध्ये गणित, अॅप्टीट्युड आणि ड्रॉईंग आहे. प्रश्न हे चार चार मार्क्ससाठी मल्टिपल चॉईस आणि न्यूमरीकल आधारीत होते. नेगेटीव्ह मार्किंगही होती.
JEE Advanced
यावर्षी 9.34 लाख उमेदवारांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 77 टक्के उमेदवारांनी डबल परिक्षा दिली. 60 टक्के विद्यार्थी असे आहेत ज्यांनी स्कोअर वाढवण्यासाठी तीन वेळा परिक्षा दिली. जेईई मेन पेपर 1 आणि पेपर 2 च्या निकालाच्या आधारावर टॉपचे 2 लाख 45 हजार विद्यार्थी हे JEE Advanced साठी पात्र झालेले आहेत. ह्या एकमेव परिक्षेतूनच देशातल्या प्रमुख अशा 23 IITs(Indian Institutes of Technology ) प्रवेश मिळेल. जेईई अॅडव्हान्सची परिक्षा ही 3 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. जेईई मेन रिजल्ट जारी झाल्यानंतर लगेचच जेईई अॅडव्हॉन्ससाठी नोंदणी सुरु झालीय. टॉपचे 2 लाख 50 हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हॉन्ससाठी पात्र आहेत. उमेदवार jeeadv.ac.in वर जाऊन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करु शकतात.
Rankings of engineering institutes for the year 2021 was launched by Union Minister of Education Shri Dharmendra Pradhan on 8th September, virtually. pic.twitter.com/ncUKWpWdLc
— Ministry of Education (@EduMinOfIndia) September 13, 2021
जेईई अॅडव्हान्ससाठी नोंदणी कशी करावी?
विद्यार्थी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सच्या मदतीने परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील.
स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा.
स्टेप 2: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या Application Form लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आता नवीन नोंदणीच्या (New Registration) लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4: यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा.
स्टेप 5: आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा, फोटो अपलोड करा आणि स्वाक्षरी करा.
स्टेप 6: त्यानंतर अर्ज फी सबमिट करा.
स्टेप 7: सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.
(jee-main-result-2021-jee-main-result-announced-18-at-no-1-rank-maharashtras-only-atharva-abhijeet-tambat-in-top)