JEE Main Results 2022: जेईई मेन 2022 (JEE Main 2022) चा सत्र 1 चा निकाल आज म्हणजेच 9 जुलै 2022 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन 2022 सत्र 1 स्कोअर कार्ड अधिकृत वेबसाइट्स, jeemain.nta.nic.in आणि ntaresults.nic.in वर ऑनलाइन जारी करणार आहे. तसेच दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिक अपडेट्स आणि माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी निकालासह सत्र 1 साठी जेईई मेन 2022 टॉपर्सची यादी देखील जाहीर करणार आहे. आज निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच 100 टक्के विद्यार्थ्यांची यादी एनटीएकडून (NTA)शेअर केली जाणार आहे.
ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. JEE मेन 2022 सत्र 2 प्रवेशपत्र 18 जुलै 2022 पर्यंत येणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षी, जेईई मेन 2022 4 सत्रांमध्ये घेण्यात आली होती. बहुतेक सत्रांसाठी, NTA ने विक्रमी वेळेत निकाल जाहीर केले. तसेच, JEE मुख्य सत्र 2,30 जुलै रोजी संपत आहे आणि निकाल देखील ऑगस्टच्या 7 दिवसात अपेक्षित आहे.
जेईई मेन 2022 चा निकाल सत्र 1 साठी जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी एकतर जेईई मेन्स सत्र 2 परीक्षा 2022 ला बसू शकतात किंवा ते जेईई अॅडव्हान्स्ड 2022 साठी अर्ज करण्याची तयारी करू शकतात. नंतरची परीक्षा आयआयटी, एनआयटीच्या प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा आहे.