सरकारी नोकरी करण्याची संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी, थेट…

| Updated on: Jul 17, 2024 | 1:24 PM

JKSSB Constable Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरतीसाठी अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.

सरकारी नोकरी करण्याची संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी, थेट...
job
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

जम्मू आणि काश्मीर सेवा निवड मंडळ JKSSB द्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. jkssb.nic.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची इतर माहिती देखील आरामात मिळेल. 30 जुलैपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. 4002 पदांसाठी ही भरती सुरू आहे. कॉन्स्टेबल पदांसाठी ही भरती सुरू असून कॉन्स्टेबल होण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. 

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला लेखी परीक्षा, शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक सहनशक्ती चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी ही प्रसिद्ध केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना शुल्क हे भरावे लागेल. 700 फीस ही भरती प्रक्रियेसाठी लागणार आहे. 

यामध्ये SC, ST आणि EWS उमेदवारांना 600 रुपये फीस भरावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावीत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी अर्ज हा व्यवस्थित तपासून घ्यावा आणि मगच सबमिट करावा.