नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि विक्रम सरायभाई अवकाश संस्था (VSSC) यांच्या तर्फे अग्निशमन दल जवानांसह अनेक पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. या भरतीअंतर्गत (ISRO Recruitment 2021) 13 पदांवर भरती करण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवार व्हीएसएसओच्या अधिकृत वेबसाईट vssc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 5 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जाची तारीख संपल्यानंतर अर्जाची लिंक वेबसाईटवरून काढण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली नमूद केलेली माहिती पुन्हा तपासून पहावी. तसेच अधिकृत सूचना तपासल्याशिवाय अर्ज करू नका. (Job Opportunity for Fireman and Lab Technician Post in ISRO, Apply on vssc.gov.in)
या पदांसाठीचे अर्ज केवळ ऑनलाईन मोडमध्ये स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्यासाठी, खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा.
– सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट vssc.gov.in वर जा.
– येथे होम पेज पर ‘ADVERTISEMENT NO. VSSC-315 DATED 20.03.2021 INVITES APPLICATION FOR THE FOLLOWING POSTS’ च्या लिंक वर क्लिक करा.
– आता अधिकृत नोटिफिकेशन दिसेल.
– यात “CLICK HERE TO APPLY” वर क्लिक करा.
– आता सर्वात आधी REGISTRATION फॉर्म भरा.
– यानंतर अॅप्लीकेशन फॉर्म भरू शकता.
– अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रिंट काढा.
या भरतीद्वारे फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन आणि फायरमॅन या पदांवर भरती करण्यात येणार आहे. यात फार्मासिस्टची 3 पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शिक्षण मंडळाकडून दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र व फार्मसी इन पदवी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असावे. याशिवाय लॅब टेक्निशियनच्या 2 जागांवर भरती होणार आहे. यातही उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी पदवी पदविका असणे आवश्यक आहे.
अग्निशमन दलाच्या 8 जागांवर भरती होईल. यात उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेसह शारीरिक पात्रतादेखील पाहिली जाणार आहे. दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्रासह, पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी आणि महिला उमेदवाराची उंची 155 सेमी असावी. त्याच वेळी, पुरुष उमेदवाराची छाती 81 ते 86 सेमी असावी. आपण अधिकृत अधिसूचनेमध्ये पात्रतेबद्दल पूर्ण माहिती पाहू शकता. (Job Opportunity for Fireman and Lab Technician Post in ISRO, Apply on vssc.gov.in)
Do You Know : जाणून घ्या का करतात लहान मुलांचे जावळ?, काय आहेत याचे फायदे?https://t.co/1twQTiVWaR#baby |##mundan |#hindu |#sanskar |#benefits
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
इतर बातम्या
प्रवाशाच्या केसांना हात लावला अन् सोनं पडायला लागलं, जाणून घ्या नेमका प्रकार काय?
चांगली बातमी! होळीच्या आधीच सोने स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा दर