केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ते या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवार cisf.gov.in CISF च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोकरीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून ती 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेअंतर्गत 451 पदांवर युवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यापैकी 183 पदे कॉन्स्टेबल/ड्रायव्हरची असतील, तर 268 पदे कॉन्स्टेबल (ड्रायव्हरलेस पंप ऑपरेटर) ची असतील. या तरुणांना दरमहा 21,700 रुपये ते 69,100 रुपये पगार दिला जाणार आहे.
वयोमर्यादा : CISF मध्ये भरतीसाठी उमेदवाराचे वय 21 ते 27 वर्षे असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 3 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे, तर एससी-एसटी उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता : CISF मध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक शिक्षित उमेदवारही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
या नोटिफिकेशनवर क्लिक करा- CISF Recruitment 2023 Official Notification