मुंबई : एलायंस एअर एव्हिएशन लिमिटेड (AAAL) मॅनेजर, सुपरव्हायझरसह (Supervisor) अनेक महत्त्वाच्या पदांवर नोकरीच्या खास संधी दिल्या आहेत. यामध्ये सगळ्यात खास बाब म्हणजे नोकरीसाठी उमेदवाराला कोणतीही परीक्षा द्याव लागणार नाही. पण तरीदेखील यामध्ये निवडले जाणारे उमेदवार हे एअर इंडियामध्ये (Air India) नोकरी करणार आहेत. यासाठी 15 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे. (jobs news air india recruitment 2021 know the last date to apply)
एअर इंडियाकडून (Air India) देण्यात आलेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी ग्राऊंड इंस्ट्रक्टर (Ground Instructor) पासून ते सीनिअर सुपरव्हायझर (Senior Supervisor) पर्यंत जागा भरण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणआर नाही. त्याजागी वॉक-इन-इंटरव्ह्यू घेतला जाईल. याच माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाईल.
अधिक माहितीनुसार, वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी 15, 16 आणि 21 जानेवारी या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. तर उमेदवार 15 जानेवारीच्या आधी Air India च्या अधिकृत वेबसाईट airindia.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या नोकरीअंतर्गत चीफ ग्राऊंड इंस्ट्रक्टसाठी 1, इंजिनिअरिंग चीफसाठी 1, रेव्हन्यू मॅनेजमेंट चीफसाठी 1, व्हाईस जनरल मॅनजरसाठी 1, एजीएम 1, एजीएमच्या SMS साठी 1 पद, एजीएम QMS 1, सीनिअर मॅनेजर (ट्रेड सेल्स) 1, कंपनी सेक्रेटरी 1 पद, मॅनेजर (ट्रेड सेल्स) साठी 2 पदं, फायनेंशिअल मॅनेजर पदावर 1 उमेदवार अशी निवड करण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त मार्केटिंग सेक्टरमध्ये 1 पद, ऑपरेशन 2 पद, ट्रेनिंग 2, आयएफएससाठी 1 पद, फायनेंस 5 पदं आणि सुपरव्हायझर (IT) साठी 1 पदावर भरती होणार आहे. यामध्ये सगळ्यात जास्त पोस्टसाठी उमेदवारांकडे MBA, पोस्ट ग्रॅजुएशन आणि पीजी डिप्लोमाची डिग्री असणं महत्त्वाचं आहे. (jobs news air india recruitment 2021 know the last date to apply)
संबंधित बातम्या –
CISF ASI Recruitment 2021 : सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी 690 जागांवर भरती, असा करा अर्ज
OSSSC Nursing Officer Recruitment 2020: 6432 पदांसाठी भरती; 93200 हजारांपर्यंत पगार
(jobs news air india recruitment 2021 know the last date to apply)