मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) चांगली संधी निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेनं विविध पदांच्या (JOB) 03 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून या संदर्भात नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी 23 मार्चपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या पदांसाठी ऑफलाईन अर्ज करायचे असून थेट मुलाखतीद्वारे (Interview) उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. मुलाखतींचं आयोजन 23 मार्च रोजी करण्यात आलं आहे. वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक, सीनियर डॉट प्लस टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिझिटर या पदासांठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या जागा कंत्राटी तत्त्वावर भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 65 असणं आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोमत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही.
1) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक : 20 हजार
2) वरिष्ठ डॉट प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक : 20 हजार
3) टीबी हेल्थ व्हिजिटर : 15 हजार 500
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारानं विज्ञान विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असावा. संगणकाचं ज्ञान देखील त्याला असणं आवश्यक आहे. याशिवाय दुचाकी चालवण्याचा परवाना देखील त्याच्याकडे असणं आवश्यक आहे.वरिष्ठ डॉट प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा आणि त्याच्याक या क्षेत्रातील अनुभव असणं आवश्यक आहे. टीबी हेल्थ व्हिजिटर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा विज्ञान शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेद्वारे उमेदवारांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली जाणार आहे. 23 मार्च रोजी महापालिका कार्यालयात मुलाखतींचं आयोजन करण्यात येणार आहे. मुलाखतींमधून उमेदवारांची निवड केली जाईल.
इतर बातम्या
Video : उमा भारतींची दारूबंदी मोहीम चिघळली, दारूच्या दुकानात घुसून दगडफेक, बाटल्या फोडल्या
प्रवीण चव्हाण यांच्या जीविताला धोका? चंद्रकांतदादांकडून केंद्राच्या संरक्षणाची मागणी!