परीक्षेचे नो टेन्शन मुलाखतीमधून होणार निवड, रेल्वे विभागात या पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

| Updated on: May 16, 2024 | 3:42 PM

Konkan Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे.

परीक्षेचे नो टेन्शन मुलाखतीमधून होणार निवड, रेल्वे विभागात या पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Railwaरेल्वेतील दुर्घटनेवेळी मृत्यू ओढावल्यास भरपाई म्हणून 5 लाख रुपये, गंभीर जखमीला 2.5 लाख रुपये तर किरकोळ जखमीला 50 हजारांची मदत देण्यात येते.y
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. शिक्षणाची आणि वयाची अट भरतीसाठी लागू करण्यात आली. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

कोकण रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही भरती प्रक्रिया तब्बल 42 पदांसाठी राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय, शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये.

https://konkanrailway.com/ येथे आपल्याला भरती प्रक्रियेची माहिती मिळेल. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेची अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी. https://konkanrailway.com/uploads/vacancy/1715260364Electrcial_dept_Notification-Contract_-Final.pdf येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी 5 जून 2024 ते 21 जून 2024 दरम्यान मुलाखती घेतल्या जाणार आहेत. उमेदवारांना सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागणार आहे. एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सीवूड्स रेल्वे स्टेशन, नवी मुंबई येथे मुलाखतींसाठी उपस्थित राहवे लागेल.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, डिझाईन असिस्टंट, तांत्रिक सहाय्यक अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. आयटीआय पास असलेले उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची मोठी संधीच आहे.