LIC Housing Finance Limited: लवकर अर्ज करा! LIC कडून भरती सुरु, पदवीधरांना उत्तम संधी!

| Updated on: Aug 06, 2022 | 8:39 AM

ही परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या 7 ते 14 दिवस आधी ॲडमिट कार्ड जारी केले जाईल. भरती मोहिमेत एकूण 80 रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 50 जागा सहाय्यक आणि 30 जागा सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या आहेत

LIC Housing Finance Limited: लवकर अर्ज करा! LIC कडून भरती सुरु, पदवीधरांना उत्तम संधी!
job vacancy
Image Credit source: Social Media
Follow us on

एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance) लिमिटेडने सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार 25 ऑगस्टपर्यंत lichousing.com अधिकृत वेबसाइटवर (Official Website) रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात. ही परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या 7 ते 14 दिवस आधी ॲडमिट कार्ड जारी केले जाईल. भरती मोहिमेत एकूण 80 रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 50 जागा सहाय्यक आणि 30 जागा सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या आहेत.”असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) पदाच्या भरतीमध्ये डीएमई आणि इतर अशा दोन श्रेणी आहेत. डीएमई श्रेणीचा अर्थ असा आहे की एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडद्वारे थेट विपणन कार्यकारी म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती. इतर प्रवर्ग म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवार,” असे अधिसूचनेत म्हटले आहे.

पात्रतेचे निकष

  • वयाची अट : किमान वयोमर्यादा 21 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे,
  • असिस्टंट मॅनेजर (डीएमई) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे.

शैक्षणिक पात्रता

  • मदतनीस: पदवीधर (किमान एकूण 55% गुण) अभ्यासक्रम फुल टाईम कॉलेज मधून केलेलाच असावा.
  • असिस्टेंट मॅनेजर (डीएमई): कोणत्याही विषयात 50% गुणांसह पदवीधर किंवा कोणत्याही विषयात पदव्युत्तर. मार्केटिंग/फायनान्समध्ये एमबीएला प्राधान्य दिले जाईल.
  • असिस्टेंट मॅनेजर(अन्य): पदवीधर (किमान एकूण 60% गुण) किंवा कोणत्याही विषयातील पदव्युत्तर. फुल टाईम कॉलेज मधून केलेलाच असावा.

शुल्क

  • अर्जदारांनी 800 रुपये अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

अधिकृत नोटीस

रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची पद्धत

  • lichousing.com अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
  • होमपेजवर ,’करिअर’ टॅबवर क्लिक करा
  • आता अर्जाच्या लिंकवर क्लिक करा
  • नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा
  • शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या
  • पदांसाठी अर्ज करण्यासाठी थेट लिंक.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी व निवड ही सहाय्यक व सहाय्यक व्यवस्थापक (इतर प्रवर्ग) साठी ऑनलाइन परीक्षा व मुलाखत या एकत्रित गुणांच्या आधारे करण्यात येणार असून कंपनीतील कामाचा अनुभव डीएमई, ऑनलाइन परीक्षा व मुलाखत फॉर असिस्टंट मॅनेजर (डीएमई प्रवर्ग) या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाणार आहे. अंतिम निवड गुणवत्तेच्या क्रमवारीनुसार काटेकोरपणे केली जाईल, मुलाखतीतील किमान पात्रता गुणांच्या अधीन असेल. गरज पडल्यास निवड प्रक्रियेत बदल करण्याचा अधिकार कंपनीकडे आहे.