Maharashtra Metro Recruitment 2022 मुंबई: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने नागपूर मेट्रो रेल्वे (Nagpur Metro) प्रोजेक्टसाठी विविध पदावंर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. मेट्रोमधील नोकरीची संधी मिळवण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीनं अर्ज सादर करणं आवश्यक आहे. अतिरिक्त महाव्यवस्थापक, सह महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अधिकारी, लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल या पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. उमदेवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी www.metrorailnagpur.com या वेबसाईटला भेट देण्याची गरज आहे.या पदासांठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करवा लागणार आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 30 मार्च 2022 ही आहे.
नागपूर रेल्वे प्रोजेक्टसाठी नागपूर मेट्रो प्रकल्पातील अतिरिक्त महाव्यवस्थापक, सह महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अधिकारी, लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल अशा 16 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पातील अतिरिक्त महाव्यवस्थापक, सह महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अधिकारी, लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल या पदांसाठी पदनिहाय पात्रता निश्चित करण्यात आली आहे. www.metrorailnagpur.com या वेबसाईटला भेट देऊन पात्रतेसंदर्भातील माहिती मिळवू शकता.
महाराष्ट्र मेट्रोने विविध पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्ष आहे.
महामेट्रोनं विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 33 हजार ते 2 लाख 60 हजारापर्यंत रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे.
महाराष्ट्र मेट्रोतील नागपूर मेट्रो प्रकल्पासाठीच्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 400 रुपये तर राकीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 100 रुपये शुल्क द्यावं लागेल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रत नागपूर मेट्रोकडे पाठवू नये असं सांगण्यात आलं आहे. तर, काही अडचण असल्यास मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड, वीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदेशपथ, नागपूर, 440010 इथं संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
इतर बातम्या:
VIDEO: फडणवीसांनी आमचं संभाषण चोरासारखं ऐकलं, अनिल गोटेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
युद्धामुळे जगाचा बाजार कोमात, पण हा शेअर एकदम जोमात! जाणून घ्या, जगातल्या सर्वात महागड्या शेअरबद्दल