मुंबई: पोरांनो दहावीचा निकाल आज म्हणजेच 17 जून 2022 ला दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तुम्ही दहावीचा निकाल (10th Results) tv9marathi.com वर येऊन बघू शकता. एकदम सोप्पं आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा रोल नंबर आणि आईचं नाव अशी माहिती विद्यार्थ्यांकडे असावी. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Results) पाहण्यासाठी तुम्हाला एक सोप्पी गोष्ट करायची आहे. बारावीप्रमाणे दहावीचा देखील निकाल तुम्हाला आमच्या TV9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तुम्हाला निकालाची घोषणा झाल्यावर tv9marathi.com वेबसाईटवर करिअर सेक्शनमध्ये (TV9 Marathi) कुठेही ही लिंक सहज उपलब्ध होणार आहे किंवा तुम्ही इथे क्लिक करून सुद्धा तुमचा दहावीचा निकाल सहज मिळवू शकता.
दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपलीय. आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 17 जून 2022 रोजी दु. 1:00 वा.ऑनलाईन जाहीर होईल. अशा पद्धतीचं ट्विट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.#SSC #results@CMOMaharashtra pic.twitter.com/oO0lyRvF3b
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2022
https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th
परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी दहावीचा म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला होता. 2021 च्या दहावी परीक्षेत साधारण 15.74 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेत एकूण 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही परीक्षेचा निकाल चांगला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.