मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (Zilla Sainik Welfare Officer) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ संवर्गातील 22 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यास 7 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. https://mpsconline.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ संवर्गातील 22 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/LKiMJx24o4
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 6, 2021
सैनिक कल्याण अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं संरक्षण दलांमध्ये मेजर रँकवर काम केलेलं असावं. संबंधित उमेदावाराला मराठीचं ज्ञान असावं. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 719 तर राखीव प्रवर्गातील उमदेवारांना 449 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागेल.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक व औरंगाबाद जिल्हा केंद्रावरील पुढील टप्प्यातील मुलाखती दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजीपासून आयोजित करण्यात येत आहेत. पुण्यात 13 ते 30 डिसेंबर दरम्यान मुलाखती होणार आहेत. तर, नाशिक केंद्रांवर 13 ते 23 डिसेंबर दरम्यान मुलाखती होमार आहेत. औरंगाबाद केंद्रावर 13 ते 16 डिसेंबर दरम्यान मुलाखती घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक व औरंगाबाद जिल्हा केंद्रावरील पुढील टप्प्यातील मुलाखती दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजीपासून आयोजित करण्यात येत आहेत. pic.twitter.com/hHfdoDNL4j
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 6, 2021
इतर बातम्या:
Mpsc result : PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षा होणार 1 जानेवारी 2022 ला
MPSC Update | PSI पदाची शारीरिक चाचणी, मुलाखत लांबणीवर, अवकाळी पावसामुळे एमपीएससीचा निर्णय
Maharashtra Public Service Commission issue notification for Zilla Sainik Welfare Officer