MPSC Result | महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020, राज्य कर निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर

| Updated on: Dec 01, 2021 | 6:56 PM

राज्य कर निरीक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या संवर्गाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC Result | महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020, राज्य कर निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 4 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये राज्य कर निरीक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या संवर्गाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी एमपीएससीच्या mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एमपीएससीने कोणत्या निकषांवर निकाल जाहीर केला ? 

हा निकाल जाहीर करताना एमपीएसीने नेमकं कोणत्या नियमांची अंमलबजावणी केलेली आहे, याबद्दल विसृतपणे सांगण्यात आलेय. एमपीएससीने सांगितल्यानुसार

1) या  पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी दिलेल्या काळात अर्ज करणान्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल

2 )अपात्र ठरणान्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येयील.

3)  मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक 1 हा 22 जानेवारी 2022 पेपर क्र.2  दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येईल.

4) प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/ समांतर आरक्षणाच्या मुद्यासंदर्भात विविध न्यायालयात तसेच न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

5) मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळवण्यात येईल.

७. मुख्य परीक्षेच्या पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती परीक्षा शुल्क मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल दावे हे मुख्य परीक्षेकरीता स्वीकारण्यात येतील.

इतर बातम्या :

परदेशात राहून राजकारण कसं होईल?; ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना टोला

Video | अंबरनाथमध्ये लग्नाच्या मंडपात हवेत गोळीबार, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून चौकशी सुरु

Twitter CEO: ट्विटरचा नवा सीईओ मुळ भारतीय आहे, मग पाकिस्तानची एवढी का खिल्ली उडवली जातेय? वाचा कारणं