MPSC Update: औषध निरीक्षक पदासाठीच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, आयोगाकडून महत्त्वाची माहिती

| Updated on: Dec 13, 2021 | 8:22 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC)17 नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक, (Drug Inspector) गट-ब संवर्गातील 87 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती.

MPSC Update: औषध निरीक्षक पदासाठीच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, आयोगाकडून महत्त्वाची माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us on

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC)17 नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक, (Drug Inspector) गट-ब संवर्गातील 87 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, या भरती प्रक्रियेसदंर्भात आयोगाकडून नवी माहिती देण्यात आली आहे. सेवा प्रवेश नियमांत बदल करण्यात येणार असल्याने ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तसं ट्विटरद्वारे कळवण्यात आलं आहे.

नेमकं कारण काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न निरीक्षक गट ब या पदासाठीची भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सेवा प्रवेश नियमांत बदल करण्यात येणार अरल्याने ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलीय.

87 पदांसाठी होणार होती भरती

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मागणीपत्रानुसार अन्न निरीक्षक गट ब या पदासाठी 87 पदांच्या भरती प्रक्रियेची जाहिरात एमपीएससीकडून 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती एमपीएससीकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली. शासनाच्या 6 डिसेंबरच्या सूचनांनुसार अन्न निरीक्षक गट ब या संवर्गाची जाहिरात आणि भरती बाबतची पुढील कार्यवाही तूर्त स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या पुणे केंद्रावरील मुलाखती स्थगित

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे जिल्हा केंद्रावर दिनांक 13 डिसेंबर, 2021 ते 16 डिसेंबर, 2021 या कालावधीत मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखत घेणाऱ्या एका सदस्याच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत.

इतर बातम्या:

संरक्षण दलात सैन्य अधिकारी व्हायचंय, महाराष्ट्र शासनाची संस्था देतेय सेवापूर्व तयारी प्रशिक्षण, अर्ज करण्याचं आवाहन

MPSC : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची जाहिरात प्रसिद्ध, 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

Maharashtra Public Service Commission stay Drug Inspector Recruitment process due to change of service rules