अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई: रेल्वे भरतीत महाराष्ट्रातील तीनशे तरुणांना डावलले गेलं असल्याचं समोर आलं आहे. अन्याय झालेल्या उमेदवारांनी मुंबई हायकोर्टात धाव घतेली आहे. रेल्वे विरोधात उमेदवारांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांसाठी 6 हजार पदांकरिता रेल्वे प्रशासनाने 2007 साली जाहिरात काढली होती.
2011 साली प्रत्यक्ष या प्रक्रियेला सुरुवात झाली. या भरती प्रक्रियेत मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूरसह राज्यातल्या ग्रामीण भागातील होतकरू तरुणांनी अर्ज केले होते. या भरती प्रक्रियेत अनेक तरुण वैद्यकीय तपासणीत पास झाले त्यांना त्यासंदर्भातील पत्रही देण्यात आले, परंतु एकाही उमेदवाराची त्यामध्ये निवड झालेली नाही.
नोकरीत रेल्वेनं भरती न करुन घेतल्यानं उमेदवारांनी कनिष्ट न्यायालयात धाव घेतली होती. या उमेदवारांनी कनिष्ठ न्यायालयात अपील केले, परंतु या न्यायालयाने तरुणांना दिलासा देण्यास नकार देत रेल्वेच्या बाजूने निकाल दिला. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आता उच्च न्यायालयात अपील करण्यात आलं आहे..
कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्यया निर्णयाविरोधात योगेश पाटील, ज्ञानेश्वर शिंदे व इतर उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. एम. पी. वशी आणि अॅड. विजय कुरले यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.
रेल्वे भरतीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. परंतु वेळेअभावी सुनावणी होऊ न शकल्याने खंडपीठाने 11 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे.
भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व रेल्वेनं यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केलं आहे. उत्तर पूर्व रेल्वेमध्ये 1664 पदांवर अप्रेंटिससाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमदेवार नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे.
अप्रेंटिस भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस कायदा 1961अंतर्गत भारतीय रेल्वेच्या विविध विभागात, कार्यशाळा आणि एनसीआर न्यायक्षेत्रातील म्हणजेच प्रयागराज, आग्रास झांशी वर्कशॉपमध्ये अप्रेंटिस करता येणार आहे.
Railway Jobs : 10वी पाससाठी तरुणांसाठी मोठी संधी, कुठल्याही परीक्षेविना मिळवा नोकरी
Maharashtra three hundred candidates file petition against Indian railway for neglecting in recruitment