Railways bharti : पुणे, मुंबईसह अन्य शहरांमध्ये रेल्वेची बंपर भरती, त्वरीत करा तुम्ही अर्ज

| Updated on: Sep 02, 2023 | 4:25 PM

indian railways bharti 2023 : भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता रेल्वेने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य विभागात अनेक जागा निघाल्या आहेत. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Railways bharti : पुणे, मुंबईसह अन्य शहरांमध्ये रेल्वेची बंपर भरती, त्वरीत करा तुम्ही अर्ज
Follow us on

पुणे | 2 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारच्या नोकरीत भारतीय रेल्वे सर्वात चांगला पर्याय आहे. यामुळे भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. आता मध्य रेल्वेने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. मध्य रेल्वेने पुणे, मुंबई, भुसावळ विभागात अनेक जागांची भरती काढली आहे. सुमारे दोन हजार जागांसाठी ही भरती होणार आहे. यासंदर्भातील जाहिरात मध्य रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. तसेच नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे.

रेल्वेत कोणत्या पदांसाठी होणार भरती

मध्य रेल्वे अपरेंटिस पदासाठी भरती करणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहे. रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०२३ आहे. यामुळे त्यापूर्वी अर्ज करुन उमेदवारांनी रेल्वे भरतीच्या परीक्षेची तयारी करावी. रेल्वेने दीर्घ कालावधीनंतर ही जाहिरात काढल्यामुळे तरुणांना चांगली संधी उपलब्ध झाली आहेत.

कोणत्या विभागात किती आहेत जागा

मध्य रेल्वेने अप्रेंटिसपदासाठी 2409 जागा काढल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा मुंबई विभागात आहेत. मुंबई विभागातून 1649 पदे भरण्यात येणार आहेत. पुणे विभागातून भरती केली जाणार आहे. पुण्यात 152 जागा आहे तर सोलापूरमध्ये 76 जागा आहे. मध्य रेल्वेचे महत्वाचा विभाग असलेल्या भुसावळमध्ये चांगली संधी आहे. या ठिकाणी तब्बल 418 जागा भरण्यात येणार आहे. नागपूर विभागातून 114 जागांची भरती करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे पात्रता

रेल्वेने दिलेल्या जाहिरातीत उमेदवाराकडून काय शैक्षणिक अर्हता हवी, ती माहिती दिली आहे. दहावीची परीक्षा 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर आहे. रेल्वेकडे आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांची परीक्षा घेण्यात येईल.

राज्यात सुरु आहे भरीत प्रक्रिया

राज्यात विविध विभागात 75 हजार जागा भरण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यासाठी पोलीस दल, तलाठी, जिल्हा परिषद, आरोग्य विभागात भरतीची प्रक्रिया सुरु आहे.