MPSC : राज्य सेवा पूर्व परिक्षेची फॉर्म भरण्याची मुदत वाढवली

| Updated on: Oct 30, 2021 | 10:28 PM

फॉर्म भरण्यासाठी 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. मात्र आता ती तारीख वाढवण्यात आली आहे. एमपीएससीनं 8 ऑक्टोबरला 290 पदांसाठी जाहीरात काढली होती. 2 जानेवारी 2022 ला एमपीएससी पूर्व परीक्षा होणार आहे.

MPSC : राज्य सेवा पूर्व परिक्षेची फॉर्म भरण्याची मुदत वाढवली
एमपीएससी
Follow us on

मुंबई : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता फॉर्म भरण्याची मुदत वाढवली असून विद्यार्थ्यांना 2 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. फॉर्म भरण्यासाठी 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. मात्र आता ती तारीख वाढवण्यात आली आहे. एमपीएससीनं 8 ऑक्टोबरला 290 पदांसाठी जाहीरात काढली होती. 2 जानेवारी 2022 ला एमपीएससी पूर्व परीक्षा होणार आहे.

राज्य सेवा परीक्षेच्या 100 जागा वाढवल्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. आता एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल.

2 जानेवारीला होणार एमपीएससीची पूर्वपरीक्षा

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

राज्य सेवा परीक्षेचं वेळापत्रक काय?

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

पदांचा तपशील

उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54,  मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtra Health Department Recruitment | आरोग्य विभागाची ‘गट ड’ भरती परीक्षा 31 ऑक्टोबरला, ‘गट क’ संवर्गातील परीक्षेची उत्तरतालिका जारी

UPSC Civil Service Prelims Results 2021: नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, 10 लाख विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा