MPSC Exams | एमपीएससीकडून जाहिरातींचा धडाका, वेगवेगळ्या विभागात 48 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

| Updated on: Oct 09, 2021 | 6:25 PM

एमपीएससीने राज्यात एकूण 48 जागांसाठी वेगवेगळ्या जाहिराती काढल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जारी केली आहे.

MPSC Exams | एमपीएससीकडून जाहिरातींचा धडाका, वेगवेगळ्या विभागात 48 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
MPSC EXAM
Follow us on

मुंबई : वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया तसेच प्रलंबित निकालाच्या मुद्द्यावर विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेगवेगळ्या विभागात पदभरतीसाठी जाहिरातींचा धडाका लावला आहे. एमपीएससीने राज्यात एकूण 48 जागांसाठी वेगवेगळ्या जाहिराती काढल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जारी केली आहे.

कोणत्या पदांसाठी जाहिरात ?

राज्य लोकसेवा आयोगाने वेगवेगळ्या विभागांसाठी सलग एकूण तीन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. आरोग्य, सार्वजिनक विभागासाठी ही पदभरती केली जाणार आहे. यामध्ये गट अ आणि गट ब संवर्गातील काही पदांचा समावेश आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर याविषयीची सविस्तर माहिती मिळेल.

जाहिरात क्रमांक एक

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील 9 पदांवरील भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जाहिरात क्रमांक 2

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा करीता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक संवर्गातील विविध विषयांच्या अनुक्रमे 5, 13, 17 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जाहिरात क्रमांक 3 

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत सातारा, अलिबाग, नंदुरबार व सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी, गट-ब संवर्गातील 4 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी 100 पदं वाढवली 

दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीप्रमाणे एकूण  209  पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. मात्र, आता ही पदसंख्या वाढवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. आयोगाने थेट 100 पदं वाढवली आहेत. त्यामुळे आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यासाठी आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक जारी केलंय. यामध्ये एकूण 20 संवर्गात 390 पदांची जाहिरात करण्यात आहे. क्लास 1 ( गट अ च्या ) 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

इतर बातम्या :

तयारीला लागा ! 2022 मधील स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यात, परिपत्रक काढून MPSCची माहिती

Breaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर

(MPSC issue advertisement for total 48 seat recruitment in various department)