मुंबई: कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षा देता आल्या नाही त्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज याला मान्यता देण्यात आली असल्याचं दत्ता भरणे यांनी सांगितलं आहे.
कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. विविध संवर्गाच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. खासदार संभाजी छत्रपती यांनी देखील विद्यार्थ्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना कोरोना काळात परीक्षा न झाल्यानं वयोमर्यादा संपल्यानं परीक्षा देता आली नव्हती. विद्यार्थ्यांची आणि अनेक राजकीय नेत्यांची मागणी वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. एकमतानं विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढवून देण्याचा निर्णय झाला, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव दोन संधी मिळावी अशी मागणी केली होती. कोरोनामुळं दोन वर्ष जाहिरात निघाली नाही, काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली. गेल्या तीन चार वर्षांपासून परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षांचे अर्ज करता येत नाहीत, असं संभाजी छत्रपती यांनी म्हटलं होतं.
इतर बातम्या:
MPSC : राज्य सेवा पूर्व परिक्षेची फॉर्म भरण्याची मुदत वाढवली
MPSC new rule Dattatray Bharane said age limit extended for those students who miss exam due to corona