मुंबई : राज्य सरकारमधील विविध विभागातील रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपूर्वी एमपीएससी आयोगाला देण्याच्या आदेशानंतर आता एमपीएससी अॅक्शन मोडवर आले आहे. मागणीपत्र प्राप्त झाल्यास येत्या नोव्हेंबर महिन्यात पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक एमपीएससी जाहीर करणार आहे. तसेच प्रलंबित निकाल 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचंदेखील नियोजन एमपीएससीकडून आखलं जात आहे. परिपत्रक जारी करत एमपीएसी आयोगाने तशी माहिती दिली आहे. (MPSC commission will publish time table of next year exam on october month of this year)
राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार आज मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं द्यावी, अशा सूचना विभागांना देण्यात आल्याचं सांगितलं होतं. सरकारच्या या आदेशानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगदेखील कामाला लागला आहे. एमपीएसीकडून ऑक्टोबर महिन्यात पुढील वर्षाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित निकालदेखील 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे एमपीएससीचे नियोजन आहे. विशेष म्हणजे एमपीएससीने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.
अजित पवार यांनी वेगवेगळ्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात आज मुंबई सविस्तर भाष्य केलं. “मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या विभागाच्या जागा भरायच्या आहेत. त्या जागांची माहिती MPSC ला कळवायची आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांना सांगितलं आहे. जागांची माहिती द्या, अशा सूचना दिल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत जागा येतील. आरक्षण आणि इतर नियमांचं पालन करुन याद्या द्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांकडून याद्या आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला माहिती दिली जाईल. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहिराती प्रसिद्ध केली जाईल, असं अजित पवार म्हणाले होते.
तसेच कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैनिक भरती असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले होते. सैन्य भरतीसंदर्भात प्रशासनाला आदेश दिले आहेत, नियमावलीची अडचण न येता, भरती कशी होईल याचं नियोजन पोलिसांनी करावं, अशा सूचना दिल्या आहेत. राज्यात सैनिकांची भरती असेल तिथे मुलींना संधी मिळावी, असं अजित पवार म्हणाले होते.
इतर बातम्या :
ज्यांच्यासोबत आयुष्यभर काम केलं, त्यांच्याकडेच लाच मागितली, नाशकात दोन क्लर्क एसीबीच्या जाळ्यात
आयकर विभागाचं धाडसत्र सुरुच; चव्हाण, देसाई, शिंदे, आव्हाडांच्या निकटवर्तीयांवर छापा!
Samsung Galaxy F42 5G चे स्पेक्स-फीचर्स लीक, जाणून घ्या कसा आहे नवा 5 जी फोन#Samsung #SamsungGalaxy #SamsungGalaxyF42https://t.co/QkTH2HbZ5o
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2021
(MPSC commission will publish time table of next year exam on october month of this year)