नवी दिल्लीः NABARD Grade A Recruitment 2021: नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (National Bank for Agriculture & Rural Development, NABARD) लवकरच ग्रेड ए आणि ग्रेड ब मधील रिक्त जागा भरण्याची तयारी करीत आहे. त्याअंतर्गत ग्रेड एमधील सहाय्यक व्यवस्थापक आणि ग्रेड बमधील व्यवस्थापक या पदांवर नेमणुका करावयाच्या आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 162 पदे भरली जाणार आहेत. नाबार्डने अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही. अशा परिस्थितीत उमेदवारांना माहितीसाठी अधिकृत वेबसाईट nabard.org वर भेट द्यावी लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी प्रारंभ तारीख – 17 जुलै 2021
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021
नाबार्ड सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए परीक्षेची तारीख – नंतर जाहीर करणार
नाबार्ड व्यवस्थापक ग्रेड बी परीक्षेची तारीख – नंतर जाहीर करणार
सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी अ (ग्रामीण विकास बँकिंग सेवा) – 148 पदे
सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए (राजभाषा सेवा) – 5 पदे
सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए (प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवा) – 2 पदे
व्यवस्थापक ग्रेड बी (ग्रामीण विकास बँकिंग सेवा) – 7 पदे
मीडिया रिपोर्टनुसार, नाबार्ड ग्रेड एच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जुलै 2021 पासून सुरू होऊ शकते. त्याचबरोबर या पदांच्या अर्जाची अंतिम तारीख 07 ऑगस्ट 2021 असेल. अर्जदारांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. तसेच हे सुनिश्चित करावे की, त्यांनी पदासाठी सर्व पात्रतेचे निकष पूर्ण केले आहेत. त्यानंतरच ते अर्ज करू शकतात.
संबंधित बातम्या
Q1FY22 Infosys Result: इन्फोसिसला 5200 कोटींचा नफा; थेट 35 हजार जणांना नोकर्या देणार
NABARD Grade A Recruitment 2021: Recruitment for 165 posts of Assistant Managers and Managers in NABARD, apply today