NCPOR recruitment 2021 नवी दिल्ली: नॅशनल सेंटर फॉर ध्रुवीय आणि महासागर संशोधन (NCPOR) कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट पदांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. नोटिफिकेशननुसार एकूण 85 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. (NCPOR recruitment 2021) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I, प्रोजेक्ट सायंटिस्ट -II, प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट, ऑफिसर (अॅडमिन), एक्झ्युक्यूटिव्ह असिस्टंट ( अॅडमिन) पदांवर भरती करण्यात येणार आहे. (NCPOR recruitment 2021 Vacancy for Project Scientist and various Post)
एनसीपीओआरनं जारी केलेल्या माहितीनुसार (NCPOR recruitment 2021) अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 17 जूनपासून सुर झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. पात्र उमेदवार ncpor.res.in वर भेट देऊन अर्ज दाखल करु शकतात.
एनसीपओआरनं जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार 85 पदांवर भरती होणार आहे. प्रोजेक्ट सायंटिस्ट-I ची 45 पदं, प्रोजेक्ट सायंटिस्ट -II ची 21, प्रोजेक्ट सायंटिस्ट -III चे 3, प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टेंटची 4, ऑफिसर (अॅडमिन)ची 5, एक्झ्युक्यूटिव असिस्टंट (अॅडमिन) च्या 10 पदांवर भरती होणार आहे.
पात्र उमेदवारांना एनसीपीओआरच्या वेबसाईट (www.ncaor.gov.in) ला भेट द्यावी लागेल.
वेबसाइटवरील ‘Career’ ऑप्शन वर क्लिक करा.यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल.
यानंतर NCPOR/09/2021 पुढील NCPOR_Advt_2021.PDF लिंक वर क्लिक करुन जाहिरात वाचून घ्या.
जाहिरात वाचल्यांतर तुम्ही पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करा.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून बीई आणि बीटेक उत्तीर्ण असणारे उमदेवार अर्ज करु शकतात. उमेदवारांकडे 7 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 35 हजारांपासून 56 हजारांपर्यंत पगार मिळणार आह.
Video | बेशुद्ध अवस्थेत खाली पडला, नंतर अचानकपणे लागला नाचायला, हा अजब गजब व्हिडीओ एकदा पाहाचhttps://t.co/L8tOZ9vxBI#virla| #ViralVideo | #party
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2021
संबंधित बातम्या:
Job News: भारतीय तटरक्षक दलामध्ये 350 जागांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
NCPOR recruitment 2021 Vacancy for Project Scientist and various Post