केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, परीक्षेचे नो टेन्शन, थेट पद्धतीने होणार निवड आणि…

| Updated on: Aug 22, 2024 | 6:03 PM

NLC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी नक्कीच आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही मोठी संधी नक्कीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, परीक्षेचे नो टेन्शन, थेट पद्धतीने होणार निवड आणि...
Neyveli Lignite Corporation
Follow us on

भारतामधील नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेली नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. ही भरती प्रकिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे. चला तर मग अजिबातच वेळ न घालता अर्ज करा. विशेष म्हणजे 500 हून अधिक पदांसाठी ही भरती सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आरामात अर्ज करू शकता. nlcindia.in या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. शिवाय याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेतून एकून 504 जागा या भरल्या जातील. यामध्ये 197 पदे अभियांत्रिकी पदवीधरांसाठी असून 155 पदे अभियांत्रिकी पदवीधर नसलेल्यांसाठी आहेत. तंत्रज्ञ डिप्लोमा अप्रेंटिसीची एकून 153 पदे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी असणे आवश्यक आहे. 

जर आपण या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार नसाल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला जनरल मॅनेजर, लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर, एनएलसी इंडिया लिमिटेड, नेवेली या पत्त्यावर अर्ज करावा लागेल. फक्त अर्जच नाही तर यासोबतच आपल्याला काही कागदपत्रांच्या झेरॉक्स देखील जोडाव्या लागतील. 

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. उमेदवाराची निवड ही थेट गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 7 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येतील. त्यानंतर आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.