नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. आता नोकरी शोधण्याचे अजिबात टेन्शन नाहीये. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही काढण्यात आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अवघ्या दोन दिवसांमध्येच सुरू होत आहे. 29 एप्रिल 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया NLC इंडिया लिमिटेड यांच्याकडून राबवली जात आहे. चला तर मग या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि अधिक माहिती.
NLC इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया 36 पदांसाठी सुरू असून या भरतीतून ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह आणि मेन्टेनन्स एक्झिक्युटिव्हची पदे भरली जाणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. शिक्षणाची अटही भरतीसाठी लागू करण्यात आलीये.
ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्हसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी असणे आवश्यक आहे. मेन्टेनन्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल, केमिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी असणे आवश्यक आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार हा देखील मिळणार आहे. https://www.nlcindia.in/new_website/careers/03-2024.pdf येथे आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही व्यवस्थित वाचायला मिळेल. उमेदवारांनी अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मग अर्ज हा करावा.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. https://www.nlcindia.in/new_website/index.htm या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 29 एप्रिल 2024 पासून ते 20 मे 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकता. मग कशाला उशीर करता, आजच भरतीच्या तयारीला लागा.