NTPC Admit Card 2021 नवी दिल्ली: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे घेण्यात येणाऱ्या सहायक अभियंता भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. सहाय्यक अभियंता पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते ते अधिकृत वेबसाइट ntpccareers.net वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. एनटीपीसीकडून 230 जागांसांठी भरती प्रकिया राबवण्यात येत आहे.
एनटीपीसीकडून 24 फेब्रुवारी रोजी परीक्षांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं होतं. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 मार्चपर्यंत वेळ देण्यात आला होता. ntpccareers.net या वेबसाईटवर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. 3 जुलै 2021 रोजी एनटीपीकडून परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे.
पदांची संख्या
एनटीपीसीनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार यामध्ये एकूण 230 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये 90, मेकॅनिकलमध्ये 70, इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रूमेंटेशनमध्ये 40 आणि असिस्टंट केमिस्टच्या 30 पदांवर भरती प्रकिया राबवली जात आहे. खुल्या प्रवर्गासाठी 101, ओबीसीसाठी 60, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 21, एससी कॅटेगरी साठी 32 आणि एसटी कॅटेगरी 16 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
निवड प्रक्रिया
ऑनलाईन अॅप्टिट्यूड टेस्टच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
एसबीआय कार्डने फॅबइंडियासोबत लाँच केले कॉन्टॅक्टलेस को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड, गिफ्ट व्हाउचरसह मिळतील हे फायदेhttps://t.co/J02raU0vg7#SBI |#Fabindia |#creditcard |#contactless
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2021
इतर बातम्या:
VIDEO | बुलडाण्याच्या शासकीय रुग्णालयातील गॅस गळतीची अफवा, रुग्णांची धावपळ
भाजपचा 26 जूनला 1 हजार ठिकाणी चक्काजाम, दखल न घेतल्यास प्रखर आंदोलन करु, चंद्रकांत पाटील यांचा इशारा
NTPC Admit Card 2021 Released for exam of Assistant Engineer Post click here to Download