मुंबई : ओडिशा लोकसेवा आयोगाने (odisha public Service Commission) पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जनच्या (veterinary Assistant Surgeon) 351 पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ओपीएससीच्या अधिकृत वेबसाइट opsc.gov.in येथे जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (OPSC recruitment 2021 veterinary Assistant Surgeon Post job vacancy How To Apply)
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 32 वर्षे निश्चित केले गेले आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 जून 2021 पासून सुरू आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2021 आहे.
या भरतीसाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 500 रुपये अर्ज फी भरावी लागेल. तर एससी / एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना फीमधून सूट देण्यात आली आहे.
पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन वर्ग -२ (गट ब) च्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 44900 पगार मिळेल.
(OPSC recruitment 2021 veterinary Assistant Surgeon Post job vacancy How To Apply)
हे ही वाचा :
Police Recruitment 2021: पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती, शेकडो जागा, वाचा अर्ज कसा करायचा?
IBPS RRB Recruitment 2021 : बँकेतील नोकरी, तगडा पगार, अर्ज करण्यासाठी उरले काही तास!