मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. ही ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड केंद्र शासनाची नवरत्न कंपनी आहे. चला तर मग इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही खरोखरच मी संधीच म्हणावी लागणार आहे.
ही भरती प्रक्रिया बारा रिक्त जागांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरतीसाठी अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया करारावर आधारित असणार आहे. ही भरती प्रक्रिया कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार या पदांसाठी सुरू आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार या दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 35 पेक्षा अधिक नसावे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना तगडा पगार देखील मिळणार आहे. फटाफट इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची एक लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर ईमेलव्दारे उमेदवारांशी संपर्क साधला जाईल. त्यानंतर उमेदवारांच्या परीक्षा आणि मुलाखती घेतल्या जातील. परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. मुलाखत आणि परीक्षा दोन्ही अत्यंत महत्वाचे असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अगोदर आपला अर्ज भरावा लागेल.
त्यानंतर अर्ज आणि काही महत्वाच्या कागदपत्रांसह kumar_vinod12@ongc.co.in या मेलवर पाठवावे लागेल. तसेच अर्ज आणि कागदपत्रेही खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवणे देखील आवश्यक आहे. कागदपत्रे पाठवण्यासाठी दुसरा मजला खोली क्रमांक 40 केडीएम भवन, मेहसाणा येथे पाठवा.उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे आणि शेवटच्या तारखेच्या अगोदर आपली अर्ज दाखल करावीत.