तरुण उद्योजकांना सुवर्णसंधी… कामगार मंत्रालयाकडून 112 जागांसाठी भरती

| Updated on: Apr 06, 2022 | 8:02 PM

कामगार मंत्रालय सध्या तरुण उद्योजकांच्या शोधात असून पदवीधर पात्र उमेदवारांना कामगार मंत्रालयात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून जास्तीत जास्त उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन कामगार मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

तरुण उद्योजकांना सुवर्णसंधी... कामगार मंत्रालयाकडून 112 जागांसाठी भरती
कामगार मंत्रालयाकडून 112 जागांसाठी भरती
Image Credit source: file
Follow us on

राज्यासह देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कंत्राटी पध्दतीने नोकर भरतीला प्राधान्य दिले जात आहे. सरकारी नोकर भरती (Recruitment) निघालीच तर त्यात संबंधित विषयांशी निगडीत शिक्षण असलेल्या उमेदवारांनाच अधिक प्राधान्य देण्यात येत असते. त्यामुळे सामान्य पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी फार कमी होत चालली आहे. परंतु तुम्ही तरुण उद्योजक व पदवीधर असाल तर कामगार मंत्रालयात (Ministry of Labour) तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. याबाबतची अर्ज प्रकिया मंत्रालयाकडून सुरु करण्यात आली आहे. यंग प्रोफेशनल या पदांसाठी ऑनलाइन (Online) पध्दतीने अर्ज करता येणार आहे. या लेखातून त्याचा अधिक तपशील जाणून घेणार आहोत.

दरम्यान, कामगार मंत्रालयाअंतर्गत ही भरती प्रकिया राबविण्यात येणार असून यासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्‍यक राहणार आहे. यंग प्रोफेशनल पदाच्या एकूण 112 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला 12 एप्रिलपर्यंत ऑनलाइन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय करिअर सेवेच्या माध्यमातून तरुण उद्योजकांची भरली केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना त्या-त्या क्षेत्राशी संबंधित अनुभव असणे आवश्‍यक राहणार आहे. तसेच वय किमान 24 व कमाल 40 ठरवुन देण्यात आले आहे. मासिक 50 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. संबंधित विषयानुरुप पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्‍यक राहणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी www.ncs.gov.in याठिकाणी भेट देउन संपूर्ण प्रवेशाची माहिती जाणून घेता येणार आहे.

काय आहे पात्रता?

1) अर्थशास्त्रात एमबीए, समाजशास्त्र, मानसशास्त्र, वित्त, सामाजिक कार्य, व्यवस्थापित वाणिज्य, ऑपरेशन्स रिसर्च, आदींमध्ये मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. पदवी किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये कमीत-कमी 50 टक्के गुण मिळवणे आवश्‍यक राहणार आहे.

2) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएड, बीई, बीए किंवा बीटेक यातील एक पदवीधारक असणे आवश्‍यक राहणार आहे. त्याचा विषयानुरुप किमान चार वर्षांचा अनुभव असावा.

3) अर्ज करताना दहावीपासूनची सर्व शैक्षणिक कागदपत्र, फोटो, प्रमाणपत्र तसेच ओळखपत्रांची आवश्‍यकता राहणार असून आरक्षणाच्या लाभासाठी जात प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्‍यक राहणार आहे.

इतर बातम्या

रेल्वेची ‘सॅलरी एक्स्प्रेस’ सुसाट! 34% डीएची रक्कम खात्यात कधी जमा होणार? उत्तर मिळालंय!

गाडीत पेट्रोल टाकू की गाडीवर ! दरवाढीने महागाईचा आगडोंब, चांद्यापासून बाद्यांपर्यंत इंधन दरवाढीने वातावरण कमालीचे तापले