पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. पासपोर्ट ऑफिसमध्ये (Passport Office) नोकरी उपलब्ध आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट अधिकाऱ्याची (Passport Officer) रिक्त जागा जारी केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकातापासून हैदराबाद, नागपूर, मदुराईपर्यंत एकूण 21 शहरांमध्ये पासपोर्ट अधिकारी भरती 2022 होणार आहे. त्यासाठी ऑफलाइन अर्ज करावा लागेल. या पदांवर पगारही उत्तम आहेत. passportindia.gov.in पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर (Official Website)जाऊन या सरकारी नोकरीची माहितीही तुम्ही मिळवू शकता. या बातमीत पुढे जॉब नोटिफिकेशन आणि फॉर्मची लिंक देण्यात आली आहे. हे भारत सरकारचे काम आहे. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट अधिकारी आणि उप पासपोर्ट अधिकारी या अनेक पदांसाठी नोकरीच्या जागा जारी केल्या आहेत. जाणून घ्या कोणत्या शहरात भरती होणार आणि किती असेल पगार?
पासपोर्ट अधिकाऱ्याचा पगार लेव्हल 12 नुसार असेल. ही वेतनश्रेणी दरमहा 78,800 ते 2.09 लाख रुपयांपर्यंत असेल. याशिवाय डीए, एचआरए आणि इतर भत्तेही मिळणार आहेत. यानुसार पासपोर्ट अधिकाऱ्याचे सुरुवातीचे वेतन दरमहा सुमारे 1.50 रुपये असेल.
त्याचबरोबर उप पासपोर्ट अधिकाऱ्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांना लेव्हल ११ नुसार पगार दिला जाणार आहे. ही वेतनश्रेणी दरमहा ६७,७०० रुपयांपासून ते 2.8 लाख रुपयांपर्यंत असेल. त्यांचे सुरुवातीचे वेतनही दरमहा सुमारे 1.30 लाख रुपये असेल.
टीपः ही भरती प्रतिनियुक्ती तत्त्वावर केली जाईल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाच प्रतिनियुक्ती तत्त्वावरील काम दिले जाणार आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे. पासपोर्ट ऑफिसर पात्रतेच्या पूर्ण पडताळणीसाठी खाली दिलेल्या नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करा.