मुंबई : एक धक्कादायक आणि हैराण करणारा प्रकार हा पुढे आलाय. यामुळे मोठा संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष घालण्याची विनंती करण्यात आलीये. अंबरनाथमधील एका कंपनीमध्ये विविध पदांसाठी मुलाखती या घेतल्या जात आहेत. मोठी बंपर भरती ही या कंपनीकडून सुरू आहे. कंपनी ही मुंबईतील अंबरनाथची मात्र, या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती या थेट गुजरात येथे घेतल्या जात आहेत. यामुळे लोकांकडून मोठा संताप हा व्यक्त केला जातोय.
आता लोक या प्रकरणानंतर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. विविध पदाच्या नोकरीसाठी गुजरातमध्ये मुलाखत होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या या निर्णयावरून मनसेचे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतलीये. थेट मनोज चव्हाण यांच्याकडून इशारा देखील देण्यात आलाय.
मनसेचे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी थेट सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही पोस्ट मुख्यमंत्री एकनाथन शिंदे यांना ट्विटरवर टॅग करत लक्ष देण्याची विनंती केली आहे. या सर्व प्रकाराची आता जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. मात्र, यावर अजूनही कंपनीने आपली भूमिका ही मांडली नाहीये.
मुख्यमंत्री साहेब हे खपवून ghaicha ka?कंपनी महाराष्ट्र मध्ये अंबरनाथ ला आणि मुलाखती गुजरात ला .हे खपवून घेणार नाही वेळीच आवरा या प्रवृत्तीला,अन्यथा मनसे सोडणार नाही…..@CMOMaharashtra @mieknathshinde @CentaurPharmaIN pic.twitter.com/Jkidv5HENo
— Manoj B Chavan waterman (@ManojBChavan5) February 7, 2024
अंबरनाथ येथील सेंटॉर फार्मा कंपनीमध्ये विविध पदांसाठी नोकरभरती सुरु आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. थेट पद्धतीनेच उमेदवारांची निवड केली जाईल. मात्र, या मुलाखती या गुजरातमध्ये घेतल्या जात आहेत.
अंबरनाथ स्थित सेंटॉर फार्मा कंपनीतील नोकरीसाठी गुजरातच्या अंकलेश्वर येथे थेट मुलाखतीद्वारे नोकरभरती सुरु आहे. कंपनीच्या गुजरातमध्ये मुलाखत घेण्याच्या निर्णयावरून लोक आक्रमक होताना दिसत आहेत. विविध पदांसाठी कंपनीकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आता याबद्दल सेंटॉर फार्मा कंपनीकडून काय भूमिका मांडली जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.