PGCIL Apprentice Recruitment 2021:पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये 1110 पदांवर भरती, आयटीआय ते पदवीधर फ्रेशर्सना मोठी संधी

| Updated on: Jul 20, 2021 | 1:19 PM

पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या गुरुग्राम, फरीदाबाद, जम्मू, लखनऊ, पटना, कोलकाता, शिलाँग, भुवनेश्वर, नागपूर, वडोदरा, हैदराबाद आणि बंगळुरु येथे वेगवेगळ्या पदांवर एक वर्ष कालावधीसाठी ट्रेनी पोस्ट साठी अर्ज मगावण्यात आले आहेत.

PGCIL Apprentice Recruitment 2021:पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये 1110 पदांवर भरती, आयटीआय ते पदवीधर फ्रेशर्सना मोठी संधी
Follow us on

PGCIL Apprentice Recruitment 2021नवी दिल्ली : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 1110 पदांवर अप्रेंटिस भरती निघाली आहे. अधिकृत माहितीनुसार पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या गुरुग्राम, फरीदाबाद, जम्मू, लखनऊ, पटना, कोलकाता, शिलाँग, भुवनेश्वर, नागपूर, वडोदरा, हैदराबाद आणि बंगळुरु येथे वेगवेगळ्या पदांवर एक वर्ष कालावधीसाठी ट्रेनी पोस्ट साठी अर्ज मगावण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार powergrid.in वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखळ करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज जमा करण्यास सुरुवात: 21 जुलै 2021
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अखेरची तारीख : 20 ऑगस्ट

पात्रता:

आयटीआय अप्रेंटिस इलेक्ट्रिकल साठी उमदेवारांचा इलेक्ट्रिकलमधील आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.डिप्लोमा अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल आणि सिव्हील) साठी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल आणि सिव्हील इंजिनिअरींगमधील डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं बीई, बी.टेक आणि बीएसी इंजिनिअरींग झालेलं असेल ते इलेक्ट्रिकल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, कॉम्युटर सायन्स मध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे.

HR एक्झ्युकेटीव्ह साठी मानव संसाधनातील एमबीए , एमएसडब्ल्यू , पर्सनल मॅनेजमेंट आणि पर्सनल मॅनेजमेंट दोन वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम

स्टायपेंड

आयटीआय अप्रेंटिस: 11 हजार
डिप्लोमा अप्रेंटिस: 12 हजार
ग्रॅज्युएट अप्रेंटिस : 15 हजार
HR एक्झ्युकेटीव्ह : 15 हजार

उमेदवारांची निवड त्यांच्या संबंधित ट्रेडमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. त्यासाठी कोणतिही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

प्रादेशिक सेनेत भरती

भारतीय सैन्यदलात नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेनेमध्ये भरती होण्याची चांगली संधी आहे. भारतीय सेना दलाचा भाग असलेल्या प्रादेशिक सेनेतील अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवार 19 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. jointerritorialarmy.gov.in या वेबसाईटवर उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

 वेतन

प्रादेशिक आर्मीनं जारी केलेल्या नोटीसमध्ये वेतनाबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 पर्यंत मिळू शकते.

 

इतर बातम्या

Territorial Army Officer Recruitment 2021: प्रादेशिक सेनेत भरती प्रक्रिया सुरु, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

Women Military Police Application 2021: महिला लष्करी पोलिसात 100 सैनिकांच्या पदांसाठी भरती, आज अर्जाचा शेवटचा दिवस

PGCIL Recruitment 2021 apprentice post on 1110 seat at various center of india